पुणे : महान्यूज लाईव्ह
अलीकडे राजकारणाचा स्तर घसरलेला आहे. या घसरलेल्या स्तरामुळे अनेक नवीन येते कोणावरही कशा पद्धतीनेही टीका करतात. कोणाच्याही वयाचा, मुलाहिजा बाळगत नाहीत. एवढेच नाही, तर असंसदीय शब्दांचा वापर आता अगदी खालच्या स्तरावर केला आहे.
बोलता बोलता थेट शिव्या देणे हा प्रकार जणू आता शिष्टाचाराचा भाग बनला आहे. यामुळेच सध्या राज्यातील जनता देखील अस्वस्थ आहे. आज तर पुण्यात चक्क तृतीयपंथीयांनीच आंदोलन आयोजित केलं. हे आंदोलन भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात राज्यभर करणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हे पहा हिजड्यांचे सरदार अशा शब्दात टीका केली. उद्धव ठाकरे यांनी नागपुरात भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका व्हिडिओ क्लिप चा आधार घेत हा नागपूरला लागलेला कलंक आहे अशा शब्दात टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना नितेश राणे यांची जीभ आणखी घसरली आणि नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांची बाजू सावरताना उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या शब्दात टीका केली.
या टिकेवरून आता राज्यभरातील तृतीयपंथीय आक्रमक झाले असून नितेश राणे यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा त्यांचा इरादा आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर तृतीयपंथीयाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान नितेश राणे जिथे दिसतील तिथे आम्ही तोंडाला काळी फसवू असा इशारा देखील तृतीयपंथीयांच्या संघटनेच्या नेत्यांनी दिला असून राणे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
नितेश राणे हे लोकप्रतिनिधी आहेत .त्यांना एवढे भान असायला हवे की आपण काय बोलायला हवे, कुठे बोलायला हवे, कसे बोलायला हवे. खरे तर केंद्र सरकारने देखील आम्हाला मान्यता दिलेली आहे, तृतीयपंथी ही आमची ओळख असली तरी ती एक संस्कृती आहे. परंतु अशा पद्धतीने विकृत मनोवृत्तीचे काही लोक असे वक्तव्य करत असल्याने आम्ही राज्यभर त्यांच्यावर आंदोलन करणार असल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केले.