फलटण : महान्यूज लाईव्ह
घटना आहे फलटणमधील.. फलटण शहरात काल रात्री जी घटना घडली, त्याची एकच चर्चा फलटणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात सुरू आहे. हनुमंत रामभाऊ पोतेकर आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर या बाप लेकाचा अचानक मृत्यू झाला आहे. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे एक गुढ असून त्यांनी घेतलेल्या औषधामुळे त्यांचा मृत्यू झाला की घातपात घडलेला आहे हे मात्र कारण अजून समजू शकले नाही.
रात्री कुटुंबासोबत जेवण झाल्यानंतर घरातील सर्वांनी आयुर्वेदिक काढा घेतला होता. मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव, त्यांचा मुलगा अमित आणि त्यांची मुलगी श्रध्दा या तिघांनाही त्रास होऊ लागला. त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान पहाटे हनुमंत पोतेकर आणि अमित यांचे अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने निधन झाले. मुलीची मात्र प्रकृती स्थिर आहे.
मात्र या दोघांचा मृत्यू विषबाधेच्या कारणाने झाला आहे की अन्य कोणत्या कारणामुळे याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.