नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
राज्यातील राष्ट्रवादीच्या बंडाळीतील प्रकरण आता निवडणूक आयोग आणि न्यायालयीन लढाईपर्यंत पोहोचले आहे. त्यातच बंड करण्यापूर्वीच अजित पवार यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा ठोकला होता आणि या संदर्भात आपणच राष्ट्रीय अध्यक्ष आहोत असे पत्र निवडणूक आयोगाला दिले होते, त्याचबरोबर चिन्हावर देखील दावा ठोकला होता. आता हळूहळू ही माहिती पुढे येत असून या सगळ्या गोष्टी शरद पवार आणि राष्ट्रवादीसाठी अडचणीच्या ठरू लागले आहेत.
आता शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून याची माहिती आपल्याला आधीच का दिली नाही? असे पत्र दिले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग देखील पक्षपातीपणाच्या चक्र विवाद चक्रविवाद अडकले आहे
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करण्यापूर्वी 30 जून रोजीच 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणूक आयोगाला दिले आणि आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव मंजूर केल्याचे पत्र देखील निवडणूक आयोगाला अजित पवार यांनी दिले होते. याची उकल अजित पवार यांच्या शपथविधीनंतर झाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची विशेषत: शरद पवार आणि त्यांच्या गटाची धावपळ उडाली आहे.
दरम्यान या संदर्भात शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष मी आहे. कोणाला काहीही व्हावसं वाटतं आणि कोणी काही नियुक्ती केल्या असतील तर त्यात तथ्य नाही. कोणाला मुख्यमंत्री, पंतप्रधान व्हायचेच असेल तर त्याच्याशी मला देणे घेणे नाही. कोणी काही बोलेल, परंतु कार्यकारणी समितीची बैठक नियमानुसार झाली. मला थांबवण्याचा कोणाचाच प्रश्न उद्भवत नाही. मी 82 वर्षाचा असेल किंवा 92 वर्षाचा असेल, त्याने काही फरक पडत नाही. उलट आता मी अधिक जोमाने कामाला लागणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.