बारामती : महान्यूज लाईव्ह
नंदीवाला अर्थात मेढंगी जोशी समाजातील पहिला फौजदार होण्याचा मान बारामती तालुक्यातील मेडद येथील अमोल चिमाजी गोंडे या युवकाने मिळवला आहे. इतरांचे भविष्य पाहता पाहता स्वतःचे भविष्य शिक्षणातून साकार करणाऱ्या या युवकाची गावाने मिरवणूक काढली. अमोल चिमाजी गोंडे या मेडंगी जोशी समाजातील पहिल्या युवकाने मिळवलेल्या या यशाबद्दल गावाला देखील आनंद झाला आहे.
आम्ही अमोल गोंडे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबाशी चर्चा केली. आजही पालात राहणाऱ्या अमोल गोंडे यांनी पाचव्या प्रयत्नात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची भावसारखे ची परीक्षा उत्तीर्ण केली. यापुढे काळात तो कायदा आणि सुव्यवस्थेच्या आरक्षणासाठी राज्यातील कोणत्याही तालुक्यात काम करेल मात्र हे करतानाच समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे आव्हानही त्याच्यासमोर असेल आणि जबाबदारी देखील.
अमोल म्हणाला मी देखील लहानपणी वडिलांबरोबर नंदीबैल घेऊन अनेकांच्या घरापुढे गेलो आहे . एके दिवशी धो धो पाऊस कोसळत होता आणि खूप चिखल झाला होता. अशावेळी पावसात उभे राहून माझे वडील इतरांना साथ घालत होते, हाक मारत होते. हे चित्र पाहून आपण ही आपली अवस्था बदलायचीच असा ठरवले आणि ज्या ज्या गावात मुक्काम करेल त्या त्या गावात घरी न बसता शाळेत गेलो आणि तेथील शिक्षण पूर्ण केले.
अनेक जिल्ह्यांमध्ये मला शिक्षण घ्यावे लागले, मात्र मी शिक्षण अर्धवट सोडले नाही. बारामतीतील तुळजाराम तुळजाराम कॉलेजमध्ये मी बीकॉम चे शिक्षण बँकिंग विषय घेऊन पूर्ण केले आणि काहीतरी व्हायचेच या ध्येयाने मी बारामतीतील विविध ग्रंथालयामध्ये जाऊन अभ्यास केला कोणत्याही अकॅडमी मध्ये जाऊन मी अभ्यास केला नाही मी माझ्या बळावर अभ्यास केला आणि आता मी यशस्वी झालो याचा खूप आनंद आहे मी माझ्या या यशाचा समाजाच्या प्रगतीसाठी सुद्धा वापर करणार आहे मी माझे काम प्रामाणिकपणे करील मात्र समाजातील मुला मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करेल आणि या पुढील काळात ते माझे देखील काम असणार आहे.
अमोल गोंडे यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल मेडद गावातील गावकऱ्यांनी त्याची गुलाल उधळत मिरवणूक काढली. त्याच्या यशाबद्दल त्याचे वडील चिमाजी गोंडे, आई मालन तसेच भाऊ दादासाहेब आणि अमोलची पत्नी नम्रता या सर्वांनीच आनंद व्यक्त केला.