सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात कृत्य केल्याचे सांगत गारटकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या सदस्यत्वावरून व पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची साथ सोडून भाजपाच्या सत्तेमध्ये सामील होत अजित पवार यांनी घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी प्रदीप गारटकर उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाच्या ध्येयधोरणा विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचे पत्र जाहीर करण्यात आले आहे.
पत्रात असे म्हटले आहे की, यापुढे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुचित केले आहे.