शिरूर : महान्यूज लाईव्ह
राज्याच्या राजकारणात सावळा गोंधळ सुरू असून शपथविधी वेळी अजित पवारांसोबत उपस्थित असलेले शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार हे यू टर्न घेत शरद पवार यांच्या सोबत गेले असल्याची चर्चा शिरूर तालुक्यात सुरू आहे.
राज्याच्या राजकारणात गेले दोन तीन दिवसांत दुपारच्या शपथविधी ने पुन्हा सावळा गोंधळ उडाला आहे.अजित पवार यांनी अचानक भाजप सोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.या शपथ विधीला शिरूर चे आमदार अशोक पवार यांसह जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते मंडळी ही उपस्थित होते.
दुपारच्या शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.यावेळी गेले दोन तीन दिवस राष्ट्रवादीचे कोणतेही पदाधिकारी जाहीर प्रतिक्रिया देत नाहीत तर आमदार पवार यांचा देखील संपर्क होत नाही. शिरूर तालुक्यात राजकीय पेचप्रसंगात भाजपचे पदाधिकारी देखील अस्वस्थ झाले असून तालुक्यात ना आनंद आहे ना फारसे नाराजीचा सूर.सर्व राजकीय पदाधिकारी सावध भूमिकेत दिसत आहेत.
गेले तीन दिवस आमदार अशोक पवार हे अजित पवार यांच्या सोबत असल्याची चर्चा होती मात्र मुंबई मध्ये पुन्हा अशोक पवार यांनी यू टर्न घेत अजित पवार यांची साथ सोडून ते शरद पवार यांच्या सोबत असल्याची चर्चा सुरू आहे.शिरूर चे खासदार हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते मात्र त्यांनतर त्यांनीही पलटी घेत शरद पवार यांची भेट राजीनामा देण्याचा विचार असल्याचे कोल्हे यांनी जाहीर केले होते.अशोक पवार यांनी यू टर्न घेतल्याने पुन्हा गल्लो गल्ली चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
शिरूरच्या राजकारणात बदलणाऱ्या घडामोडींनी सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र संभ्रमात असून इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती कार्यकर्त्यांची झाली आहे.