पुणे – महान्यूज लाईव्ह
कोण कधी कशाचा वापर करेल सांगता येत नाही. ४१ वर्षीय महिलेने दुबईतून पुण्यात येताना चक्क २० लाख रुपये किंमतीचे अर्धा किलो सोने प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवून आणले होते, ग्रीन चॅनेलने ही संशयास्पद तस्करी लक्षात आणून दिली आणि कस्टम विभागाने ही चोरी पकडली.
१ जुलै रोजी हा प्रकार उघडकीस आला. पुण्यातील ही महिला दुबईहून पुण्याकडे स्पाईसजेट विमानाने येत होती. पुणे विमानतळावर आल्यानंतर तिची तपासणी करताना कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संशयास्पद हालचाली लक्षात आल्या.
त्यांनी तिची तपासणी ग्रीन चॅनेलमधून केली आणि तेव्हाच तिने शरीरात काहीतरी लपवून आणल्याचे लक्षात आले.जेव्हा महिला अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली, तेव्हा तिने गुप्तांगात लपवून ठेवलेल्या सोन्याच्या कॅप्सूल दिसून आल्या. ४११ ग्रॅम वजनाच्या २० कॅप्सूल तिने गुप्तांगात दडवल्या होत्या.