पुणे – महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीची वाटचाल शिवसेनेसारखीच सुरू असून एकनाथ शिंदे स्टाईल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्षावर दावा ठोकलेला आहे, अशातच शपथविधीवेळी अजित पवारांसोबत राहीलेले खासदार अमोल कोल्हे यांनी २४ तासांतच घुमजाव करीत आपण शरद पवारांसोबत असल्याचे जाहीर केले, मात्र काही वेळातच त्यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे सांगत शरद पवारांनाही धक्का दिला.
मात्र आपण हा राजीनामा शरद पवारांकडे देणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. मतदारांनी जे मतदान केले, ते एका विचारधारेला समोर ठेवून दिले होते, त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आपण राजीनामा देणार असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.
आपण छत्रपती शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांच्या भूमिका करून इतिहास सांगण्याचा प्रयत्न करीत असताना आपणच जर नैतिक मुल्यांच्या विरोधात जात असू तर ते योग्य नाही, मी पवारसाहेबांसोबतच आहे, मात्र जे अनैतिक राजकारण सुरू आहे, ते पाहता मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देणार आहे असे कोल्हे यांनी सांगितले आहे.