विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बसअपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावरचा हा सर्वात मोठा आणि भीषण अपघात होता. विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी बस लोखंडी पोलला धडकली आणि बसने पेट घेतला. या आगीत साखरझोपेत असलेले प्रवासी होरपळे आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.बसमधील प्रवासी नागपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातले होते. समृद्धी महामार्गावरील अपघातावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
समृद्धी महामार्गावर गेल्या काही काळात अनेक अपघात झालेत.सातत्याने अपघात होतात आणि हे चित्र काही महिने बघायला मिळत आहे.मी त्या रस्त्याने गेलो होतो,त्यावेळी तिथल्या लोकांना त्यांचा अनुभव विचारला.यावर तिथल्या लोकांनी या मार्गावर सातत्याने अपघात पाहिला मिळतात,जो अपघातात मृत्यूपावतो तो देवेंद्रवासी होतो.असं तेथील लोक सांगतात अशा शब्दात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अपघाताचं महत्त्वाचं कारण रस्त्याचं काम शास्त्रीय पद्धतीने झालेलं नसावं. ज्यांनी रस्त्यांचं नियोजन केलं.ते लोक दोषी ठरवतात असं शरद पवार यांनी म्हटल आहे.
जे झाले ते वाईट झाले. ५ लाख मदत देऊन प्रश्न सुटत नाहीत. असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी तज्ज्ञ लोकांची समिती तयार करावी. त्यांनी रस्त्याची कमतरता शोधून काढावी आणि अपघाताच्या घटना रोखाव्यात असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. समृद्धी मार्गावर रस्त्यावर खुणा बघायला मिळत नाहीत, सलग रस्ता आहे. त्यामुळे वाहन चालवताना काही गोष्टी लक्षात येत नाही अस काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे नीट अभ्यास होणे गरजेचे आहे असा सल्लाही शरद पवार यांनी दिला आहे.