छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधील कारकिन या भागातील ही घटना. बऱ्याचदा लहान मुले पाणी घेण्यासाठी पाईपला तोंड लावून पाणी ओढतात. मात्र हे ओढणे छत्रपती संभाजीनगर मधील तेरा वर्षे मुलाच्या चांगलेच अंगलट आले.
घरात पाणी येत नाही म्हणून टाकीला पाईप लावून त्या पाईपमधून मुलाने पाणी ओढायला सुरुवात काय केली, घशात पाणी ओढल्यामुळे अगोदरच पाईप मध्ये असलेले मुंगळे थेट त्याच्या घशात गेले. लाल मुंगळे तोंडात गेल्यामुळे त्यांनी चावायला सुरुवात केली आणि मुलाने थयथयाट सुरू केला. मुलाच्या आरड्याओरड्यामुळे पालकांनी तातडीने धाव घेऊन त्याच्या घशातील काही मुंगळे बाहेर काढले.
पण बरेचसे मुंगळे घशात अडकलेले दिसल्यामुळे त्यांनी त्याला थेट कांचनवाडी येथील दवाखान्यात नेले. तिथे डॉक्टर शेखर खोबरे यांनी मुलाची अवस्था लक्षात घेत गांभीर्याने तातडीने उपचार सुरू केले आणि लॅरिंगोस्कोपीने स्वरयंत्रात गेलेले मुगळे बाहेर काढले.