पुणे – महान्यूज लाईव्ह
अल्पवयीन मुलीवर प्रौढ किंवा पूर्ण वयाच्या सज्ञान मुलाने किंवा पुरूषाने बलात्कार केल्याच्या घटना आपण दररोजच ऐकतो.. मात्र घिसाडघाईच्या जीवनशैलीत होत असलेले बदल अत्यंत चिंतेचे बनू लागले आहेत. लोणावळ्याच्या परिसरातील जिल्हा परीषदेच्या शाळेतील प्रकार अत्यंत चिंतेचा असून या प्रकारामुळे पालकही हादरून गेले आहेत.
लोणावळ्याच्या नजिकच्या भागातील एका जिल्हा परीषद शाळेत हा प्रकार घडला असून या प्रकरणात पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. अर्थात मुलगा अल्पवयीन असल्याने फक्त गुन्हेगारीच्या वाढत्या व बदलत्या प्रकाराचीच नव्हे तर एकूणच समाजव्यवस्थेपुढील भयंकर आव्हानांचीही चिंता वाढली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी व मुलगा दोघेही जिल्हा परीषदेच्या त्याच शाळेत शिकतात. मुलाने या मुलीचा हात जबरदस्तीने पकडून तिला शौचालयात नेले व तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पिडीत मुलगी घाबरली व ओरडली.
तिने घरी जाऊन हा प्रकार सांगितला. यावरून पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून मुलाला पोलिसांनी बालकल्याण समितीपुढे हजर केले. तर मुलीचीही तपासणी करण्यात आली. एकूणच सामान्यपणे घडणाऱ्या इतर गुन्ह्यांप्रमाणे हा गुन्हा नाही, मात्र यापुढील काळात असे गुन्हे कायदा व सुव्यवस्थेवर मोठा ताण आणतील या प्रश्नाने पोलिसही चक्रावून गेले आहेत.