मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यात शिंदे फडणवीस सरकारने केंद्र सरकारने लागू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधीप्रमाणेच राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्यातील 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एक जुलै रोजी या योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे. यामुळे केंद्राचे दोन हजार रुपये आणि राज्याचे दोन हजार रुपये असे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत.
अर्थात या योजनेमध्ये राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण त्यांनी आधार प्रमाणी करण्यासह इतर अटी व निकष पूर्ण केलेले नाहीत, त्यामुळे हे शेतकरी वगळले जाणार आहेत. त्यामुळे ज्यांना आता दोन हजार रुपयांचा हप्ता येतो ते शेतकरी या नमो शेतकरी महासन्मान योजनेत सहभागी असतील.
येत्या एक जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या नमो योजनेची सुरुवात होणार असून पंतप्रधानांच्या उपस्थितीत भव्य दिव्य कार्यक्रमात ही योजना सुरू होणार आहे. कृषी दिनाचे अवचित साधून या योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणे करण केवायसी आणि मालमत्ता नोंदी केलेल्या नाहीत, अशा 16 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही, मात्र त्यांनी तातडीने या निकषांची पूर्तता करावी असे आवाहन करण्यात आले आहे.