• Contact us
  • About us
Thursday, September 21, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापूर शहराच्या 13 कोटींचा निधी हर्षवर्धन पाटील यांच्यामुळेच… राष्ट्रवादीचा कसलाच संबंध नाही.. : शरद जामदार यांनी गारटकरांना ठणकावले!

Maha News Live by Maha News Live
June 28, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

नरसिंहपुर पोलीस ठाण्याचे खा.सुप्रिया सुळे यांच्या कडून नुकतेच गुपचूप बेकायदेशीरपणे उद्घाटन.. खा.सुळे यांनी राजशिष्टाचार पाळला का ? ॲड. शरद जामदार यांचा प्रदीप गारटकर यांना जाहीर सवाल..

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर शहराच्या विकासासाठी शिवसेना-भाजप सरकारकडून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी 13 कोटींचा निधी आणला आहे. निधी मंजूरीची पत्रे शासनाने हर्षवर्धन पाटील यांना दिली आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी आणल्याचा कांगावा करत दिशाभूल केली जात आहे. या कामाशी राष्ट्रवादीचा किंवा आमदारांचा कसलाही संबंध नाही, अशी माहिती सांगत भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ॲड. शरद जामदार पत्रकारांना बोलताना म्हणाले की, इंदापूर शहरात नुकत्याच झालेल्या 13 कोटींच्या विकासकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास भाजप नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना इच्छा असूनही व्यस्त कामांमुळे येता आले नसल्याचे स्पष्ट केले. सदर कामांची भूमिपूजने जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य हर्षवर्धन पाटील यांनी दहा दिवसांपूर्वी दि.18 जून रोजी केली असून, ती नियमानुसार आहेत. इंदापूर शहराच्या विकासासाठी शिवसेना-भाजप सरकार कटिबद्ध असून, सदरच्या विकास कामांच्या निधीशी राष्ट्रवादी काँग्रेसचा अथवा त्यांच्या आमदाराचा काडीमात्र संबंध नाही, असे त्यांनी सांगितले.

हर्षवर्धन पाटील यांनी केलेली भूमिपूजने बेकायदेशीर असल्याचा आरोप पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सोमवारी (दि. 26) केला होता. यावर शरद जामदार यांनी प्रतिक्रिया दिली. इंदापूर शहराच्या विकासासाठी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नातून शिवसेना-भाजप युती सरकारकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 महाराष्ट्र नगरोत्थान अभियान या योजनेतून रु.10 कोटींचा निधी 24 फेब्रुवारी 2023 रोजी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच नगर विकास विभागाच्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी विकास कार्यक्रमांतर्गत रु. 3 कोटीचा निधी दि.17 मार्च 2023 रोजी मंजूर करण्यात आला आहे. सदरच्या एकूण रु. 13 कोटीच्या निधी मंजूरीची पत्रे शासनाने हर्षवर्धन पाटील यांना दिली आहेत.

सदर निधी मंजूर केलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर शहरवासीयांच्या वतीने अभिनंदन करीत, सर्व विकासकामांची भूमिपूजने नियमानुसार केली. इंदापूर शहराच्या विकासासाठी शिवसेना-भाजप सरकार हे भरीव निधी देत असलेबद्दल विरोधकांनी स्वागत करायला हवे होते, असा टोला यावेळी ॲड.जामदार यांनी लगावला.

आगामी काळातही भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शिवसेना-भाजप सरकारकडून इंदापूर शहर व तालुक्याच्या विकासाठी भरघोस निधीचा ओघ कायम राहणार असल्याचे जामदार यांनी सांगितले. जामदार यांनी नरसिंहपुर येथे पोलीस ठाण्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांनी बेकायदेशीर केल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथे राज्य शासनाच्या गृह विभागाच्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचे गुपचूप उद्घाटन खा.सुप्रिया सुळे यांनी 5 जून रोजी बेकायदेशीरपणे केले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष गारटकरांच्या म्हणण्यानुसार खा.सुळे यांनी राजशिष्टाचार पाळला का? त्यावेळी उद्घाटनास साधा पोलीसही उपस्थित नव्हता. सदरच्या बेकायदेशीर उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रदीप गारटकर यांनी नीरा नरसिंगपूर पोलीस स्टेशन इमारतीच्या उद्घाटनावर बोलणार का? असा सवालही जामदार यांनी केला.

Next Post

रात्री उशिरापर्यंत जागताय? सावधान! उशीरापर्यंत जागरण पडेल महागात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मांढरदेव काळेश्वरी देवीचा दर्शन गाभारा आठ दिवसांसाठी बंद!

September 21, 2023

चक्क एका पाण्याच्या बाटलीनेच स्टोरी सांगितली..७० हजार रुपयांची इंटरनेटची केबल कोणी चोरली?

September 21, 2023

असला कुठे जावई असतो काय? सासरवाडीत एका पाठोपाठ सहा जणांना भोसकले, बायकोसह तीन जण जागीच गेले!

September 21, 2023

शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सातारा जिल्हयातुन हद्दपार! शिरवळ पोलीसांची कारवाई

September 21, 2023

अंकिता पाटील ठाकरे आता भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष!

September 21, 2023

महाराष्ट्रातलं बहुचर्चित राहणारं पार्टी ट्रस्ट यंदा सांगोल्यात बरं का!

September 21, 2023

प्रवीण माने तेथे दिसले..अन् सुरू झाली पुन्हा एकदा भैय्या नावाच्या वादळाची चर्चा..

September 21, 2023

इंदापुरात गावोगावी विकासपुरुषांचा हैदोस! ठेकेदारांना तर, भय कशाचे उरले नाही.. हा कसला विकास म्हणायचा?

September 21, 2023

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलकांचा खंडाळा घाटात दीड तास ठिय्या!

September 21, 2023

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आनेवाडी टोलनाका प्रशासनाने मोफत पिण्याच्या पाण्याच्या
बाटलींचे वाटप केले!

September 20, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group