आंतरराष्ट्रीय दौऱ्यात पहिल्यांदाच अमेरिकेतील पत्रकार परिषद घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षेप्रमाणे तुमच्या देशात लोकशाही धोक्यात, अल्पसंख्यांकांवरील हल्ले रोखण्यासाठी तुम्ही काय करणार असा प्रश्न पत्रकारांनी मोदींना विचारला आणि त्यावरील उत्तर मोदींनी बेधडकपणे दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. काल त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जौ बायडेन यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली.
या परीषदेत प्रश्न विचारल्यानंतर मोदी उत्तरादाखल म्हणाले. मला एक लक्षात येत नाही, पत्रकार म्हणाले, लोक म्हणतात की, भारतात लोकशाही आहे. म्हणतात नाही, मुळात भारत हा एक लोकशाही देश आहे. राष्ट्रपती बायडेन यांनी सांगितले त्याप्रमाणे भारत व अमेरिका या दोन्हींच्या डीएनए मध्ये लोकशाही आहे.
आमच्या देशात फक्त कायद्यानेच लोकशाही नाही, तर लोकशाही आम्ही जगतो. आमचे ते स्फूर्तीस्थान आहे. आमच्या पूर्वजांनी याला शब्दांमध्ये संविधानाच्या रुपात बांधले आहे. आमचे सरकार लोकशाहीचाच मूलभूत आधार घेऊन चालते. आमचे सरकार व संविधान हातात हात घालून चालते.
आमचे सरकार कोणत्याही भेदभावाला जागा देत नाही. जेव्हा आम्ही लोकशाहीचा विचार करतो, तेव्हा जर मानवी मुल्ये जपली नाहीत, मानवी हक्क जपली नाहीत, तर ती लोकशाहीच नाही. जेव्हा तुम्ही लोकशाहीचा स्विकार करता, तेव्हा ती घेऊनच जगले पाहिजे. भारतात सबका साथ, सबका वकास, सबका प्रयास हीच स्थिती आहे.
भारतात लोकशाही मुल्यांमध्ये आम्ही कोणताही भेदभाव करत नाही. त्याला देशात थारा नाही. धर्म, जाती, वय, लिंग कोणत्याही स्तरावर कोणताही भेदभाव नाही. त्यामुळेच जगातील सर्वात मोठे लोकशाहीचे दश असलेले अमेरिका व भारत विश्वशांतीमध्ये खूप मोठे योगदान देऊ शकतात. आम्ही दोन्ही देशांतील नागरिकांचीच नाही, तर संपूर्ण जगाच्या अपेक्षा पूर्ण करू शकू तेवढी क्षमता दोन्ही देशात आहे.