पुणे : महान्यूज लाईव्ह
वनपरिक्षेत्र अधिकारी झालेली दर्शना दत्तू पवार हिच्या खुनाचं गूढ अखेर पोलिसांनी उलगडलं, मात्र पोलिसांनी अद्याप राहुल हांडोरेनं असं का केलं? हे सांगितले नाही तथापि राहुल आणि दर्शना हे नातेवाईक होते अशी माहिती राहुल हंडोरे यांनी दिल्या असून राहुल हा दर्शनाच्या मागे लग्नासाठी गळ घालत होता आणि याच कारणावरून त्याने तिचा खून केल्याचे समोर आलं आहे.
राहुल हांडोरे हा पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर अजूनही बरीच उकल होण्याची शक्यता आहे. तथापि प्राथमिक तपासातून दर्शना हिच्या हत्येचे कारण पुढे आलं आहे. दर्शनाच्या हत्येनंतर राहुल वेगवेगळ्या राज्यात देखील फिरायला गेल्याचा समोर आलं आहे. दर्शना आणि राहुल एकमेकांच्या नातेवाईक होते आणि दोन वर्षापासून ते रिलेशनशिपमध्ये होते.
मात्र राहुलनेच तिच्याशी ब्रेकअप केलं, पण ती अधिकारी झाल्यावर राहुल पुन्हा तिच्या मागे लग्नासाठी लागला होता. दोघेही एमपीएससी परीक्षा देत असताना दर्शना यशस्वी झाली, मात्र राहुल यशस्वी झाला नव्हता. याच दरम्यान दर्शनाच्या आई-वडिलांनी तिच्या लग्नासाठी स्थळ पाहण्यास सुरुवात केली होती आणि त्यामुळे अस्वस्थ असलेल्या राहुल हंडोरेने अचानक हा विकृत निर्णय घेतला.
या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ मितेश घट्टे,उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर,सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, पोलिस हवालदार रामदास बाबर, राजू मोमीन, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, तुषार भोईटे,मंगेश भगत, दगडु वीरकर, वेल्हे पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, योगेश जाधव, ज्ञानदीप धीवर, औदुंबर अडवाल, राहुल काळे,अजय शिंदे, आकाश पाटील, गणेश चंदनशिव, ज्ञानेश्वर शेडगे, विजय घोयने, विक्रांत गायकवाड, संतोष पाटोळे यांनी तपास केला आहे.