शिरूर : महान्यूज लाईव्ह
चार दिवसापूर्वी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावच्या हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी दर्शना पवार या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्या अधिकारी युवतीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यामध्ये दर्शना आणि तिचा मित्र जाताना दिसले, मात्र येताना फक्त तो एकटाच दिसला आणि पोलिसांच्या मनात घातपाताचा संशय बळावला.
त्यातच दर्शना हिच्या शरीरावर असलेल्या खुणा यामुळे पोलिसांनी हा हत्येचा प्रकार असल्याचे ताडले आणि त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब होले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि त्यांच्या पथकाने यामध्ये मोठी कामगिरी बजावली.
१२ जून 2023 रोजी सकाळी दहा वाजता राजगड किल्ल्यावर फिरायला जाते म्हणून सांगून ती मैत्रिणीकडून निघाली, मात्र ती परत आली नाही म्हणून तिचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता असल्याची खबर नोंदवली होती आणि त्यानंतर मात्र तिचा मृतदेह 18 जून रोजी आढळून आला आणि सगळीकडे खळबळ उडाली.
तपासातील परिस्थितीजन्य पुरावे व प्रत्यक्ष माहितगार आणि साक्षीदार यांच्या आधारे पोलिसांनी राहुल उर्फ सुधीर दत्तात्रय हंडोरे (वय 28 वर्ष राहणार हिंगणे होम कॉलनी दत्त मंदिराजवळ कर्वेनगर पुणे, मूळ राहणार शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक) हा या गुन्ह्यातील मुख्य संशयित असल्याचे आणि गुन्हा घडल्यापासून तो पळून गेला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
त्यानुसार पोलिसांनी त्याला तपासाला सुरुवात केली आणि अंधेरी रेल्वे स्टेशन येथून त्याला ताब्यात घेतले त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले असून या गुन्ह्यातील त्याचा हेतू काय होता हे पोलीस तपासत आहेत. दर्शना पवार ही नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून राज्यसेवा परीक्षा देऊन वनपरिक्षेत्राधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले असून ती काही दिवसात वनपरिक्षेत्राधिकारी होणार होती. मात्र त्यापूर्वीच तिचा खून झाला. आज राज्यात स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने जे अस्वस्थ वातावरण आहे. त्या अस्वस्थ वातावरणाच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली.
या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ मितेश घट्टे,उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर,सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे,पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, पोलिस हवालदार रामदास बाबर,राजू मोमीन, अमोल शेडगे,बा ळासाहेब खडके,,तुषार भोईटे, मंगेश भगत,दगडु वीरकर,वेल्हे पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार,योगेश जाधव,ज्ञानदीप धीवर,औदुंबर अडवाल,राहुल काळे,अजय शिंदे, आकाश पाटील, गणेश चंदनशिव, ज्ञानेश्वर शेडगे,विजय घोयने,विक्रांत गायकवाड, संतोष पाटोळे, यांनी तपास केला आहे.