बारामती – महान्यूज लाईव्ह
नीटच्या परीक्षेत बारामतीच्या सिध्दी वजरिंगकर पाठोपाठ बारामतीतील प्रथितयश वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अजिंक्यराजे निंबाळकर यांच्या मुलाने विक्रम राजेनिंबाळकरने देशात ७२ वी तर खुल्या गटात ५६ वी रॅंक पटकावली.
बारामतीतील डॉ. अजिंक्यराजे निंबाळकर व डॉ. प्राची राजेनिंबाळकर यांचा विक्रम हा मुलगा असून नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत विक्रमने भौतिक व जीवशास्त्रात नैत्रदिपक कामगिरी केली आहे.
विक्रमने भौतिकशास्त्र व जीवशास्त्रात १८० पैकी १८० गुण मिळवले, तर ७२० पैकी तब्बल ७१० गुण मिळवत महाराष्ट्रात बारामतीचे नाव कोरले. विक्रमने दहावीपर्यंतचे शिक्षण विद्या प्रतिष्ठानच्या सीबीएसई स्कूलमधून तर ११ वीनंतरचे शिक्षण चैतन्य अकॅडमीत पूर्ण केले.
बारामतीच्या इतिहासात सर्वाधिक गुण मिळविण्याचा भीमपराक्रम त्याने केला असून भारतातील कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल बारामतीतील पालकांनीही त्याचे अभिनंदन केले.