राजेंद झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : समग्र शिक्षा पुणे जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कमलाकांत म्हेत्रे यांनी दिली.
सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षासाठी या वर्षीपासून समग्र पुणे जिल्हा शिक्षण परिषदेच्या अंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या एकूण २ लाख ७२ हजार ३५ विद्यार्थी व इयत्ता पाचवी ते आठवी २ लाख ४७ हजार ९१० अशा इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण ५ लाख १९ हजार ९४५ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी प्रत्येक शाळा स्तरावर पाठ्यपुस्तके पोहच झालेली आहेत.
ही पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहेत. एकात्मिक स्वरूपात चार भागात पाठ्यपुस्तकाची छपाई झालेली असून विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी तथा सरावासाठी कोरीपाने जोडलेली आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार आहे. चारही भागात सर्व विषयांचा समावेश असून अनुक्रमे एका वेळेस एकाच भागाचे अध्यापन होणार आहे.
त्यामुळे विद्यार्थी एका वेळी एकच पुस्तक आणू शकेल तसेच गणवेश प्रति विद्यार्थी तीनशे रुपये प्रमाणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण १ लाख ६० हजार १६७ पात्र विद्यार्थ्यांसाठी रुपये ४८०५०१००/- रक्कम वाटप करण्यात आले आहे. दुसऱ्या गणवेशासाठी शासन स्तरावरून रक्कम प्राप्त होतात ऑनलाईन पद्धतीने पीएफएमएस द्वारे वाटप करण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समिती यांना असणार असून यामध्ये रंग व आकार ठरविण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस आहेत. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक ८ जून २०२४ नुसार स्काऊट गाईड या द्वितीय गणवेशाचे खरेदी करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
त्यासाठी शासन स्तरावरून निधी प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वांना मोफत पाठपुस्तके व पात्र लाभार्थ्यांना गणवेश उपलब्ध होणार आहेत तसेच नवगताचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती मार्फत केले जाणार आहे. जिल्हा स्तरावरील अधिकारी शाळेच्या पहिल्या दिवशी भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. अशी माहिती जिल्हा शिक्षण अधिकारी कमलाकर म्हेत्रे यांनी दिली.