बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही जणांनी सातव चौक निवडला. मात्र त्यामागेही वाढदिवस साजरा करताना शुभेच्छांपेक्षा, परिसरातील नागरिकांवर दहशत वाजवण्याचा प्रकार प्रयत्न अधिक होता. त्यामुळे भर रस्त्यात केक कापण्याचा कार्यक्रम पोरांनी आखला. पोलिसांना याची कुणकुण लागली आणि वाढदिवस होता त्याच्यासह सडकसख्याहरी तरुणांची पळता भुई थोडी झाली.

बारामती शहर पोलिसांनी या संदर्भात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी अधिक माहिती दिली. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या वाढदिवसासाठी काही टारगट पोरांनी सातव चौकातील भर रस्त्यात केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला.
अनेक जण येथे गोळा झाले आणि पोलिसांना याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच शहर पोलिसांची पथके तिथं पोचली. पोलीस आल्याचे दिसताच वाट दिसेल तिकडे सारे पळत सुटले. तरीसुद्धा पोलिसांनी येथील प्रमुख चौघांना पकडले आणि त्यांच्यावर कारवाई केली.
1. राहुल राजेंद्र मदने (रा. प्रगतीनगर, बारामती जिल्हा पुणे), 2. विकास नानासो चंदनशिवे (रा. मळद तालुका बारामती जिल्हा पुणे), 3. अक्षय भीमराव कांबळे (वय 26 वर्ष रा आमराई बस स्टॅन्ड समोर बारामती जिल्हा पुणे), 4. सागर रमेश आटोळे (वय 29 रा कसबा चांदणी चौक बारामती जिल्हा पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर पोलिसांनी विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला.