कार्यकारिणीत सर्व महिला सदस्यांच्या निवडी करत रचला इतिहास..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इंदापूरच्या अध्यक्षपदी स्त्रीरोग तज्ञ डॉ.कल्पना खाडे, उपाध्यक्ष पदी वालचंदनगरच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. अनुराधा कांडलकर, सचिव पदी स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रतिभा वणवे, खजिनदार पदी डॉ. महेश रुपनवर यांची सन २०२३-२४ या वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा दि.९ जून रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. रविंद्र कुटे, माईर्स एमआयटी च्या संचालिका डॉ. सुचित्रा कराड, अश्विनी हॉस्पीटल चे डॉ. एम. के. इनामदार, डॉ. राम अरणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
नवनियुक्त कार्यकारिणी मध्ये डॉ. माधुरी चंदनशिवे, डॉ. कोमल गार्डे, डॉ. दिपाली खबाले, डॉ. शुभांगी शिंदे, डॉ. सविता पोमणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे असोसिएशनच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्ण महिला सदस्यांची कार्यकारिणी निवडण्यात आली. नवनियुक्त सर्व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.