धाराशिव : महान्यूज लाईव्ह
मॉर्निंग वॉकसाठी निघालेले धाराशिव चे खासदार व ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर यांच्यावर आज एकाने डंपर घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यासह राज्यभरात खळबळून आले असून यामागे घातपात की अन्य प्रकार त्याची तपासणी पोलीस करत आहेत.आज सकाळी गोवर्धनवाडी नजीक हा प्रकार घडला, ज्यावेळी सकाळी सात वाजता ओमराजे निंबाळकर मॉर्निंग वॉकसाठी निघालेले होते. यापूर्वी देखील सन 2019 मध्ये प्रचारासाठी गेले असताना ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
या घटने प्रकरणी खासदार निंबाळकर यांनी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी रामेश्वर बंडू कांबळे (रा. अंबाजोगाई, जि. बीड) या डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे त्यांच्या अंगावर डंपर घालण्याचा किल्ला प्रयत्न जाणून-बुजून घातपात होता की अन्य प्रकार हे पोलीस तपासत आहेत.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या दिशेने हा भरदाव डंपर येत असल्याचे पाहताच निंबाळकर यांनी उडी मारल्याने निंबाळकर थोडक्यात बचावले. मात्र त्यानंतर एका दुचाकीचालकाला बोलवून त्याच्या दुचाकीवर बसून त्यांनी डंपर चालकाचा पाठलाग करून त्यांनी डंपरचालकास पकडले