सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : दुध दरवाढीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी ९ वाजता निमगाव केतकी येथे रस्ता रोको व चक्काजामचे आयोजन करण्यात आले आहेअशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय राऊत यांनी दिली.
हा रास्ता रोको प्रहार जनशक्ती पक्ष व रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीने निमगाव केतकी येथे व्याहाळी चौक येथे होणार असून या आंदोलनात इंदापूर तालुक्यातील दुध उत्पादक शेतकरी,प्रहार दुध उत्पादक शेतकरी संघटना उपस्थित राहणार आहेत.दुध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संजय राऊत यांच्या वतीने करण्यात आले आहे.