नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
विवाहानंतर मधुचंद्राची रात्र एका नवदांपत्यासाठी शेवटची ठरली. त्यामुळे लग्न घरातील आनंद एका क्षणात शोकसागरात बुडाला. मात्र एकाच वेळी एकाच ठिकाणी 22 आणि 20 वर्षे वयोगटातील दोघांचाही मृत्यू होणं हे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच इतरांसाठी सुद्धा एक आव्हान ठरल आहे, कारण त्याची कारणमिमांसा केल्यानंतर जे कारण पुढे आले आहे, त्यामुळे आता पुढील काळ किती धोक्याचा ठरणार आहे याची संकेत मिळत आहेत.
उत्तर प्रदेशातील ही घटना असून नुकतेच लग्न झालेले नवदांपत्य मधुचंद्राच्या रात्री घरात गेल्यानंतर उठलेच नाहीत. नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजा ठोठावूनही कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडून जेव्हा कुटुंबीयांनी आज प्रवेश केला, तेव्हा दोघेही मृतावस्थेत आढळून आले.
त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मात्र या घटनेने परिसरासह संपूर्ण गावाला धक्का बसला. या घटनेची मोठी चर्चा होत होती. मात्र जेव्हा डॉक्टरांनी या दोघांच्या मृतदेहाचं शिवविच्छेदन केलं, तेव्हा त्यातून एक महत्त्वाची गोष्ट बाहेर आली, ती म्हणजे दोघांनाही एकाच वेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.
20 आणि 22 वर्षाच्या तरुणांना हृदयविकाराचा धक्का कसा येऊ शकतो? अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली, तेव्हा डॉक्टरांनी कोरोनाच्या काळाशी संबंध जोडला. कोरोनाने संपूर्ण परिस्थिती बदलली असून कोरोना हा आर एन एस प्रकारचा विषाणू आहे.
अशा प्रकारच्या विषाणूमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात किंवा ब्लॉकेज वाढतात. ज्यामुळे हृदयातील रक्तप्रवाह असामान्य होतो आणि हृदयविकाराचा झटका येतो. अर्थात या नवदांपत्याच्या मृत्यूमागे फक्त लैंगिक क्रिया एवढेच कारण जोडता येणार नाही असे देखील डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. रात्रीचे जागरण, फास्ट फूड चा जास्त वापर, तणाव ही सुद्धा कारणे यामागे असल्याचे डॉक्टरांनी नमूद केलं आहे.