बोरीवली : महान्यूज लाईव्ह
आता ते कडवे हिंदुत्ववादी शोधण्याची वेळ आली आहे; ज्यांनी सुटकेस, फ्रिज अशा प्रकारची अनेक वाक्ये वापरली! बुडाखाली काय जळते याची पण नोंद घेतली पाहिजे ना? म्हणजे बोरवलीत काय झाले ते पाहिले पाहिजे ना! पण त्याला आता जास्त हवा दिली जात नाही; कारण तो आंतरधर्मीय नाही, तो एकच धर्मातला त्यातही कडव्या धर्मातला विषय आहे ना! त्यामुळे कदाचित कडवे धर्मवादी जागचे हलणार नाहीत..!
ज्या महिलेने आपल्या वरती प्रेम केले अनाथाश्रमात शिकूनही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एका रेशन दुकानदारावर प्रेम केले, त्या रेशन दुकानदाराने क्रौर्याची परिसीमा गाठली. मनोज साने हे त्यांना नराधमाचं नाव; आणि जी बळी पडली ती सरस्वती वैद्य! मीरा-भाईंदर भागातील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर फ्लॅटमध्ये तुकडे केलेला तिचा मृतदेह पोलिसांना सापडला. फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याची तक्रार स्थानिकांनी केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
सरस्वती ही मनोज वैद्य याच्यासोबत गेली अनेक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. बोरीवलीच्या रेशन दुकानात या दोघांची ओळख झाली आणि सन 2014 पासून ते एकत्र राहत होते. मीरा रोड येथील आकाशदीप सोसायटीत ही घटना घडली. सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कोणाला कळणार नाहीत, पुरावा नष्ट व्हावा म्हणून मनोज साने हा प्रेशर कुकरमध्ये तुकडे उकळायचा.
त्याचे बारीक तुकडे करायचा आणि नंतर तो पिशवीत भरून गटारात फेकून द्यायचा. करवतीच्या साहाय्याने त्याने सरस्वतीचे तुकडे केले. रविवारपासून त्याने सरस्वती वैद्य हिच्या मृतदेहाच्या अर्ध्या भागाची विल्हेवाट अशा पद्धतीने लावली होती. एवढेच नाही तर तो अचानक कुत्र्यांना खायला घालू लागल्याने देखील स्थानिकांना आश्चर्य वाटत होते आणि जेव्हा त्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले आणि हळूहळू सारा प्रकार उघडकीस आला.