बारामती : महान्यूज लाईव्ह
सामाजिक शांततेचे आव्हान सरकार करतच आहे परंतु जर औरंगजेबाचे फोटो घेऊन कोणी नाचत असेल तर ते आता कायमचं बंद करावे लागेल महाविकास आघाडी सरकारच्या मागच्या अडीच वर्षाच्या काळातील मुदतीकरणामुळेच असे प्रकार घडत असल्याचा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केला.
पालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आज बारामतीत आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांचे संवाद साधला यावेळी त्यांच्यासमवेत आमदार जयकुमार गोरे हेदेखील उपस्थित होते.
विखे म्हणाले की, मागच्या आघाडी सरकारच्या काळात औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहण्याचे प्रकार घडले. उस्मान शेरगिल सारखी प्रकरणे घडली, मात्र महाविकास आघाडी शांत राहिली आणि आता ते आम्हाला ब्रह्मज्ञान शिकवत आहेत. मागील अडीच वर्षांपूर्वीच्या काळात जे मोठ्या प्रमाणावर उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला.
सामाजिक शांतता टिकवण्याचे काम आहे, सरकार ते करतेय, मात्र आपल्या सरकारच्या काळात काय घडले हेही विचार महाविकास आघाडीने करावा. आमच्या सरकारच्या काळात समाजविघातक व्यक्ती त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची सूचना दिलेल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व प्रकारावर बारकाईने नियंत्रण ठेवून आहेत.
औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचण्याचे धाडस केले जात आहे. त्याबद्दल मात्र महाविकास आघाडीचे नेते काहीच बोलत नाहीत, तेथे मात्र ते चुप्पी साधून आहेत. ही दुटप्पी भूमिका आहे. ती जनतेसमोर येत आहे, परंतु असे फोटो घेऊन असणारे जे लोक आहेत त्यांचं कायमस्वरूपी नाचणे बंद करावे लागेल.