दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
आयुष्यात कधी कधी शिक्षणाची कवाडे लग्नानंतर मुलं झाल्यानंतर उघडी होतात आणि अनेक जण त्यामध्ये आपले शिक्षण पूर्ण करताना दिसतात. पण महाराष्ट्रामध्ये खंडाळा तालुक्यात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे, जिथे एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 109 जणींनी शाळा सोडून वीस-पंचवीस वर्षे झाल्यानंतर पुन्हा दहावी पास करायचा संकल्प केला आणि तो यशस्वी देखील करून दाखवला आहे.
सेकंड चान्स प्रोग्राम मुळेच आम्ही दहावीची परीक्षा ऊतीर्ण झालो अशी प्रतिक्रिया खंडाळा तालुक्यातील शेकडो महीलांनी दिली. खंडाळा तालुक्यातील शिक्षण पुर्ण करण्याचा मानस असणाऱ्या, पण शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या, घरकाम, शेतमजुरी करणाऱ्या महिलांची ही शिक्षणाची उमेद अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
सेकंड चान्स प्रोग्राम या माध्यमातून १०९ महिलांनी दहावीची परिक्षा दिली. महत्त्वाचे म्हणजे या सर्व महिलांच्या शिक्षणात २५, ३० वर्षे एवढे अंतर पडलेले होते, मात्र सेकंन्ड चान्स प्रोग्राम व त्यांच्या शिक्षकांमुळे खंडाळा तालुक्यातील १०९ महीलांपैकी १०२ महीला यात चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झाल्या.
यामध्ये प्रेरिता संजय धोतमल ८०%, स्मिता कोडिंबा हळदे ७८%, तर रोहिणी पाडुरंग शेलार ७५% यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले असून या महिलांच्या यशाबद्दल महिलांचे व सेकंड चान्स प्रोग्राम व त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन व कौतुक होतेय.
या महिलांना मिळालेले यश पाहुन खंडाळा तालुक्यातील ज्या महिला सेकंड चान्स प्रोग्राम च्या माध्यमातून आपली राहिलेली दहावी उत्तीर्ण होण्याची इच्छा बाळगून आहेत अशा महिलांनी नूतन दळवी (मो.नं.९९२२०९०१८९) व सम्राट गायकवाड (७५१७६०१९००) यांचेशी संपर्क साधावा असे अहवान करण्यात आले आहे
चौकट
शिक्षण क्षेत्रात महिलांनसाठी खंडाळा तालुक्यातीलच सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया भरला आणी याच खंडाळ्यातुन यासर्व जिद्दी आणी होतकरु महीलांनी घरकाम,शेतीकाम व आपल्या लहान लहान मुलांना घेऊन आठवड्यातील तिन दिवस वर्गात व तिन दिवस आँनलाईन शिक्षण घेऊन भरघोस यश संपादन केले हि खरोखरच कौतुकास्पद बाब आसुन यांचे करावे तेव्हडे कौतुक थोडेच