दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व सातारा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कमंत्री अजय कुमार मिश्रा हे दक्षिण काशी वाई शहराच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कृष्णा नदी घाटावर भेट दिली. या वेळी भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माजी आमदार मदन दादा भोसले यांनी स्वागत केले.
वाई शहराचे आराध्य दैवत असलेल्या महागणपतीची आरती त्यांच्या हस्ते या वेळी करण्यात आली.या वेळी त्यांच्या समवेत माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार मदन भोसले, अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, माजी जिल्हाअध्यक्ष विक्रम
पावस्कर हे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने भाजपच्या वतीने विशेष जनसपंर्क अभियान वाई, खंडाळा महाबळेश्वर या तीनही तालुक्यात महिनाभर विविध उपक्रमांनी राबविले जात असल्याची माहिती माजी आमदार मदन भोसले यांनी अजय मिश्रा यांना दिली.२०२४ लोकसभा मिशन यशस्वी करण्या साठी त्यांचा हा संपर्क दौरा होता .
यावेळी अविनाश फरांदे, यशराज भोसले, सचिन घाटके, यशवंत लेले, रोहिदास पिसाळ, चंद्रकांत चव्हाण, प्रविण जगताप, मनोज कदम, सागर पवार, नितीन भिलारे, मनिषा घैसास, तेजस जमदाडे, संतोष जमदाडे, वसंत शिंदे आदी उपस्थित होते.