इंदोर : महान्यूज लाईव्ह
अंगात येणे हा प्रकार तसा ग्रामीण भागासाठी काहीच नवा नाही. अनेक अंधश्रद्धा विरोधी कायदे झाले तरी देवाला मानणं आणि अंगात येणं हे प्रकार कमी होतील असे वाटत नाही, पण कधी कधी अंगात देवाच्या पुढेच यावं असं नाही. आपल्याला त्रास झाल्यानंतर सुद्धा अंगात येतं आणि ते अंगात आलेलं अनेकांसाठी चर्चेचा विषय बनतं.
मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडली बहना अशी एक नवीन योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत 1000 रुपये प्रति महिना अनुदान सरकार देते. त्यासाठी बँकेत खाते काढावे लागते. या योजनेला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. मात्र बँकेमध्ये खात्याला आधार लिंक असेल तरच योजनेचा अनुदान मिळणार असं सरकारने जाहीर केलं.
त्यामुळे आपल्या बँक खात्याला आधार लिंक केले आहे की नाही हे पाहण्यासाठी धावपळ उडाली. एक महिला बँकेत गेली आणि तिच्या लक्षात आले की, आधार लिंक वेळेत न झाल्यामुळे लाडली बहिणा योजनेसाठी उशीर झाला आणि तिला अनुदान मिळालेले नाही. मग या महिलेने सगळीकडे आकांडतांडव केला. बँकेमध्ये ती आरडाओरडा करत असतानाच तिच्या अंगात देवी आली आणि तिने चांगलाच गोंधळ घातला.
थोडा वेळ तिच्यात अंगातील देवी घुमत राहिली मग ती थोडी शांत झाली आणि तिने सरकारला शाप दिला. या घटनेचा व्हिडिओ सगळीकडे वायरल झाला असून मध्य प्रदेश युवक काँग्रेसने देखील हा व्हिडिओ ट्विट करत यावर टीका केली आहे.