दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
मांढरदेवी येथील युवकांनी शिवराज्याभिषेक दिनाचे तसेच काळेश्वरी सेवा प्रतिष्ठानचे सदस्य मंगेश मांढरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मांढरदेवी काळुबाई मंदिर परिसरातील संपूर्ण स्वच्छता केली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या काळुबाई देवीस राज्यातून तसेच परराज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी मांढरदेवला येत असतात. नवसाला पावणारा देवी असल्यामुळे येताना ज्या भाविकांच्या मनोकामना, नवस पूर्ण झालेले असतात. असे भाविक देवीला पुरणपोळीचा नैवेद्य तसेच बकरी कोंबड्याचा नैवेद्य करत असतात. त्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असतो.
परिसरातील त्या सर्व कचऱ्याची साफ-सफाई करून एका वेगळ्या पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचा संकल्प गावातील युवक मुलांनी केला.आणि या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचे नियोजन गणेश बोबडे आणि परशुराम मांढरे यांच्याकडून केले गेले. त्यांना काळेश्वरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाथा मांढरे यांनी मार्गदर्शन केले आणि काळेश्वरी सेवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शेखर मांढरे, श्रीकांत मांढरे, सुनिल मांढरे, विशाल मांढरे, अक्षय कळंबे, तेजस मांढरे, सोमनाथ भानसे, प्रवीण मांढरे, अमर मांढरे, पांडुरंग मांढरे, निलेश मांढरे, राजू शिंदे, सचिन मांढरे, अमित मांढरे, अभी मांढरे, आश्विन मांढरे, योगेश जाधव, सूयोग जाधव, पंकज कळंबे, चंदू मोरे, अजित मांढरे अशा अनेक युवकांनी योगदान दिले.
हे काम करत असताना भाविकांनीही समाधान व्यक्त केले. परिसरात असलेले टॉयलेट, बाथरूम मध्ये पाण्याच्या अभावामुळे दुर्गंधी आणि घाण झालेली होती. त्याची साफ-सफाई ट्रस्टकडून ठेवली गेली, तर त्याचा सुद्धा वापर भाविकांना करता येईल अशी आशा भाविकांकडून व्यक्त करण्यात आली. या सफाई कामासाठी मांढरदेव येथील ज्या ज्या युवकांनी योगदान दिले त्या सर्वांचे मांढरदेव ग्रामस्थ व काळेश्वरी सेवा प्रतिष्ठानने कौतुक करून आभार मानले.