बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील धीरज जाधव क्रिकेट अकादमीचे वेगवान गोलंदाज मोईन बागवान व फिरकी गोलंदाज स्वराज वाबळे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रिमियर लिग च्या स्पर्धेच्या लिलाव प्रक्रियसाठी निवड झाली आहे.
यापूर्वी स्वराज वाबळे याची महाराष्ट्र अंडर 25 संघासाठी तसेच मोईन बागवान यांची महाराट्र अंडर 23 संघासाठी निवड झाली होती. एमपीएल साठी महाराष्ट्रातून २५० खेळाडूमध्ये यांची निवड झाली आहे. आयपीएल नंतर ची T-20 मध्ये भारतातील सर्वात मोठी स्पर्धा असा नावलौकिक मान या स्पर्धेस मिळाला आहे.
बारामतीत अनेक होतकरू खेळाडूमध्ये खेळाडू असून ज्यांना आगामी MCA च्या स्पर्धासाठी निवड चाचणीस पाठवणार असून बारामतीतील खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ निर्माण करण्याचे आश्वासन अकॅडमीचे प्रमुख रणजीपटू धीरज जाधव यांनी दिले आहे.