इंदापूर तालुक्यातील जल जीवन मिशन बाबत बैठक..निकृष्ट दर्जाचे काम करणाराची गय केली जाणार नाही
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती खात्याचे राज्य मंत्री प्रल्हादसिंह पटेल हे उद्या सोमवारी बारामतीच्या दौऱ्यावर येत असून इंदापूर तालुक्यातील विविध कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. उद्या इंदापूर तालुक्यातील जलजीवन मिशनची कामे दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक महत्वाची असून योजनांमधील त्रुटी व अडचणी संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. इंदापूर तालुक्यातील जल जीवनच्या कामांमध्ये जर अनियमितता आढळून येत असेल किंवा ती कामे निकृष्ट दर्जाची होत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा ही पाटील यांनी दिला आहे.
प्रल्हादसिंग पटेल यांच्या उपस्थितीत उद्या सोमवारी (दि.5) दुपारी 12.30 वाजता जंक्शन येथे लघु उद्योजक, व्यापारी यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व भाजपचे हिमाचल प्रदेशचे सहप्रभारी रवींद्र टंडन हेही या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमानंतर दुपारी 1.45 वाजता तानाजी थोरात यांच्या मानकरवाडी येथील निवासस्थानी प्रल्हाद सिंह पटेल यांच्या समवेत बैठक होणार आहे. यानंतर दुपारी 3 वा. प्रल्हाद सिंग पटेल यांच्या हस्ते उद्धट प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी घोलपवाडी येथे इंदापूर तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी यांचेसमवेत केंद्र व राज्य सरकारचे जल मिशनचे अधिकारी, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे अधिकारी आदींची बैठक होणार आहे.
प्रल्हादसिंह पटेल हेच या खात्याचे मंत्री आहेत.
इंदापूर तालुक्यामध्ये 1335 कोटी रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकारने हरघर हरजल योजनेसाठी दिला आहे. सदर योजनांमधील त्रुटी व अडचणी संदर्भात बैठकीत चर्चा होईल. इंदापूर तालुक्यामध्ये जल जीवन मिशनची कामे दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी सदर बैठक महत्वाचे असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून ‘ हर घर हर जल ‘ योजना राबविली जात आहे. त्याचा लाभ पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावाला मिळत आहे. इंदापूर तालुक्यामध्ये 1353 कोटी रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकारने हरघर हरजल योजनेसाठी दिला आहे. कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होणेसाठी कामातील अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला. महासंपर्क अभियानाच्या कालावधीमध्ये सोशल मीडिया, रॅली, लाभार्थी मिळावे, प्रत्येक तालुक्यातील 10 हजार नागरिकांना कार्यकर्ते हे भेटणार आहेत, अशी माहिती यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.