मांडवगण फराटा : महान्यूज लाईव्ह
प्रचंड उन्हाळा सर्वत्र जाणवत असताना मोबाईल चा स्फोट होऊन चिमुकल्याला डोळ्याला इजा झाल्याचा प्रकार शिरूर तालुक्यात घडला आहे. साहिल नानासो मस्के (रा. पिंपळसूटी) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.
सविस्तर असे की, साहिल हा मुलगा गुरुवार (दि.१) रोजी मोबाईल हाताळत असताना अचानक हातातील मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. मोबाईलचा स्फोट झाल्यावर काही क्षण त्याला काही समजले नाही. स्फोटाच्या आवाजाने घरातील कुटुंबीय धावत आले.
त्यावेळी साहीलच्या डोळ्याला इजा झाली होती. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी डोळ्याचे ऑपरेशन करावे लागेल असे नानासो मस्के यांना सांगितले.
सदर बाब आमदार अशोक पवार यांना समजली.यावेळी साहिल यास उपचारासाठी तातडीने एच व्ही देसाई हडपसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी देखील तात्काळ दखल घेऊन साहिल चे डोळ्याचे वेळेमध्ये ऑपरेशन केले. आमदार अशोक पवार यांनी या कामी मोठी मदत केली.
दिवसेंदिवस अधिकाधिक स्मार्ट फोन चा वापर होत असताना त्याचे दुष्परिणाम ही दिसून येत असून मोबाईल वापरताना सर्वांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.