राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या कडेला असलेल्या वन क्षेत्रातील आणि नैसर्गिक वैभव आणि नटलेल्या चिंचबनातील अतिशय जुनी व मोठ्या झाडांच्या बुद्यांना आग लावून ती पेटवून देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडुन केला जातोय, परिणामी या चिंचबनातील अतिशय जुनी व मोठी वृक्ष मोठ्या संख्येने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.दौंड वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षांमुळे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. दौंड तालुक्यातील कानगाव येथील भीमा नदीच्या काठावर वनक्षेत्राच्या हद्दीत चिंच, वड, पिंपळ, लिंब, जांभूळ या वृक्षांची झाडे मोठ्या संख्येने आहेत. यामध्ये चिंचेच्या झाडांची संख्या मोठी आहे. नदीलगत नैसर्गिक सौंदर्य असलेल्या या ठिकाणाला चिंचबन हे नाव पडले आहे. मात्र या चिंचबनातील चिंच, लिंब व इतर झाडांच्या बुध्यांना काही समाजकंटक आग लावून ती पेटवून देत आहेत. त्यामुळे अनेक वृक्ष जळून गेले आहेत. तर अनेक वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मध्यंतरी भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करुन व वाळू वाहतूक करण्यासाठी यामधील अनेक झाडे तोडून रस्ता केला होता. तर आधी मधी सरपणासाठी या परिस्थितीत झाडे तोडली जातात. मात्र मागील काही दिवसांपासून या चिंचबनातील झाडांना आगे लावून तीन नष्ट करण्याचा प्रकाश समोर आला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक उन्हाळा असल्याने कानगाव व मांडवगण परिसरातील अनेक नागरिक या चिंचबनातील नैसर्गिक वातावरणात झाडांच्या सावलीखाली विसावा घेत असतात तर मद्यपान करणारे मद्यपी, जुगारी पत्ते व गांजाचे सेवन करणारे काही समाजकंटक या ठिकाणी असतात. त्यांच्याकडून झाडांच्या बुंधांना आग लावण्याचे प्रकार घडत आहेत का? की कोणी झाडे तोडून ती विक्री करण्याच्या उद्देशाने पेटवून देत आहेत? असा संशय या भागातील वन्य प्रेमींकडुन व्यक्त केली जात आहे. दौंड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या चिंचबनातील वृक्षांची पाहणी करावी, या ठिकाणी येण्यास कडक निबंध लावण्यात यावे, या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी, या चिंचबनातील इतर वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करावी, या ठिकाणी पुन्हा वृक्ष लागवड करावी तसेच या झाडांना आगी लावणाऱ्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करून ठोस कारवाई करावी. अशी मागणी कानगाव व मांडवगण परीसरातील वन्यप्रेमी व ग्रामस्थांकडून होत आहे.