किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात व बारामतीच्या पूर्व भागात मोठा प्रभाव असलेल्या छत्रपती शिक्षण संस्थेच्या 15 शाळांचा दहावीचा निकाल समाधानकारक लागला. इंदापूर व बारामतीत शिक्षण संस्थेच्या शाखा असलेल्या पंधरा शाळांमध्ये 93.20% गुण मिळवून बेलवाडी येथील श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालयाचा विद्यार्थी शिवम अजित पवार याने प्रथम क्रमांक मिळवला तर 90 टक्के गुण मिळवून सणसरच्या छत्रपती हायस्कूल मधील साक्षी देविदास जगताप हिने द्वितीय क्रमांक व सणसरच्याच छत्रपती हायस्कूल मधील रेणुका दीपक शिंदे हिने ८९.८० टक्के गुण मिळवून संस्थेत तिसरा क्रमांक पटकावला.
आज दहावीच्या जाहीर झालेल्या निकालात छत्रपती शिक्षण संस्थेच्या पंधरा शाळांचा 89.90% सरासरी निकाल लागला. संस्थेच्या भवानीनगर येथील छत्रपतींच्या मुलाच्या हायस्कूलचा शेकडा निकाल ८६.७४% लागला असून, या शाळेत ओम सचिन सपकाळ व संग्राम धनंजय लवटे यांनी दोघांनी 85.40 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर पियुष पोपट देवकर याने 82.80% गुण मिळवून दुसरा व हरीश संभाजी भोईटे याने ८२.६० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.
मानकरवाडीच्या छत्रपती हायस्कूलच्या भागशाळेचा 95.65% सरासरी निकाल लागला असून या विद्यालयातून 88.80% गुण मिळवून वैष्णवी दत्तात्रय कांबळे ही प्रथम आली, तर वैष्णवी संतोष शिर्के हिने 84.80% व सानिका अशोक घाडगे हिने 83.80% गुण मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
भवानीनगर येथील छत्रपतींच्या मुलींच्या हायस्कूलमध्ये 97.62 टक्के सरासरी निकाल लागला असून या विद्यालयातून वैष्णवी मोरे यांनी 88.80% गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला तर पियुष नानासाहेब टकले याने 88% व शेजल पांडुरंग जाधव हिने 85 टक्के गुण मिळवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.
भवानीनगर येथील छत्रपती इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला. या विद्यालयात प्रेम नंदकुमार थोरात याने ८६.६० टक्के गुण मिळवून प्रथम, श्वेता राजेंद्र रेवगे हिने 85 टक्के गुण मिळवून द्वितीय तर ओंकार सर्जेराव शिंगाडे याने 84.80% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला.
छत्रपती हायस्कूल सणसर मध्ये साक्षी जगताप व रेणुका शिंदे यांच्यानंतर सृष्टी वायसे हिने ८७.८० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. बेलवाडीच्या श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालयाचा 95.23% निकाल लागला असून या विद्यालयाचा शिवम अजित पवार हा विद्यार्थी संस्थेत प्रथम आला, तर अक्षय अंकुश पवार यांनी ८६.६० टक्के गुण मिळवून द्वितीय व मानव दत्तात्रय जाधव याने 84.20% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला.
अंथुर्णे येथील छत्रपती हायस्कूलच्या शाखेत 88.46% निकाल लागला असून 78.7% गुण मिळवून श्रावणी संजय साबळे ही विद्यार्थिनी प्रथम आली, तर 77.40% गुण मिळवून यशस्वी सतीश साबळे ही दुसरी व ऐश्वर्या दादा धोत्रे हिने ७७.२० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. या शाळेत तीनही क्रमांक विद्यार्थिनींनीच पटकावले आहेत.
काटेवाडीच्या छत्रपती हायस्कूल चा निकाल ८५.७१ टक्के लागला असून या शाळेत आलिशा महमद डांगे हिने ८१.६० टक्के गुण मिळवून पहिला नंबर मिळवला तर आकांक्षा संतोष वीरकर व ऋषिकेश बाळू गायकवाड या दोन विद्यार्थ्यांना 78 टक्के गुण मिळाले व त्यांचा दुसरा क्रमांक आला तर वैशाली समीर सोलंकर हिने ७६.६० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला.
पिंपळे येथील श्रीमती हौसाबाई पांडुरंग घोरपडे विद्यालयाचा सरासरी निकाल ८४.७८ टक्के लागला असून या शाळेतून चेतन बाळासाहेब बनसोडे याने 84.80% गुण मिळवून प्रथम, प्रियंका अशोक कानडी हिने ८४ टक्के गुण मिळवून, द्वितीय तर आर्यन प्रकाश गोसावी याने 83.60 क्रमांक मिळवला.
सोनगाव येथील छत्रपती हायस्कूलचा सरासरी निकाल शंभर टक्के लागला. या विद्यालयातून रिया राजेंद्र जाधव हिने ८९ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक मिळवला तर समीक्षा संदीप देवकाते हिने ८८.० टक्के गुण मिळवून द्वितीय तर श्रावणी सचिन माने हिने ८६.६० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला.
सिद्धेश्वर निंबोडी येथील छत्रपती हायस्कूलचा सरासरी निकाल ८२.३५ टक्के लागला असून, या विद्यालयातून सार्थक सुधीर फडके याने 85 टक्के गुण मिळवून प्रथम, सिद्धी हनुमंत गायकवाड हिने ८१.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर अनुराधा शिवाजी पवार हिने ७६ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला.
उद्धट येथील छत्रपती हायस्कूलचा सरासरी निकाल शंभर टक्के लागला. या विद्यालयात चारच मुले परीक्षेत बसली होती, ती चारही उत्तीर्ण झाली. ओम किसन सोनवणे याने 65.80% गुण मिळवून पहिला क्रमांक मिळवला. तन्मय शंकर नामदास याने 60.20% गुण मिळवून दुसरा तर समीर महादेव माने याने 43.60% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला.
परीटवाडी येथील छत्रपती हायस्कूलचा सरासरी निकाल ६६.६० टक्के लागला. यामध्ये काजल तायप्पा शिंदे हिने 75.80% गुण मिळवून प्रथम, संध्या बंडू भोसले हे येथे 73.80% गुण मिळवून द्वितीय, तर वैष्णवी परशुराम गायकवाड हिने 57.66% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला.
शिंदेवाडी येथील छत्रपती हायस्कूलचा सरासरी निकाल ९४.७३ टक्के लागला असून नम्रता मनोज म्हेत्रे हिने 83 टक्के गुण मिळवून प्रथम, तेजश्री प्रकाश कुंभार व सुहानी पोपट शिंदे या दोघींना ७३.६० टक्के गुण मिळाले, त्यांचा द्वितीय तर सागर नाथा पाटील याला ७२.२० टक्के गुण मिळाले त्याचा तिसरा क्रमांक आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने सर्व मुख्याध्यापकांनी व छत्रपती कारखान्याच्या संचालकांनी अभिनंदन केले आहे.