राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या निकालाचा आजचा दिवस आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शुक्रवारी दि. २ जून २०२३ रोजी) जाहीर होणार आहे.
बोर्डाकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली असून दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळामध्ये मार्च आणि एप्रिल 2023 दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षेला राज्यातील ८ लाख ४४ हजार, ११६ विद्यार्थी व ७ लाख, ३३ हजार, ६७ विद्यार्थिनींनी सहभागी झाले होते. याशिवाय ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थी व ७३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. हा निकाल http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहायला मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होणार आहे.