चंद्रपूर : महान्यूज लाईव्ह
तीन दिवसांपूर्वीच वडिलांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचीही प्रकृती अत्यवस्थ असल्याची चर्चा होती. त्यांना दिल्लीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचेही आज पहाटे निधन झाले.
दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचा कालपासून उपचाराला प्रतिसाद नव्हता. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज पहाटे त्यांनी मेदांता रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. वरोरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून महाराष्ट्रात निवडून आले 2014 मध्ये त्यांच्यावर शरीर स्थूलतेची शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र त्यानंतरच्या काळात आठवड्यामध्ये गुंतागुंत झाल्याने त्यांचे प्रकृती अत्यवस्थ बनली होती त्यामुळे त्यांना मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. २६ मे रोजी त्यांना सुरुवातीला मुतखड्याचा त्रास सुरू झाल्याने नागपुरात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. मात्र गुंतागुंत वाढल्याने त्यांना तातडीने दिल्लीच्या मेदांता हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले होते.
अगोदर शिवसेना व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर- वणी- आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांचे जाळे आणि भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना विजय मिळवला.
बाळू धानोरकर हे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या गावचे रहिवासी आहेत. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हाप्रमुख अशी पदे त्यांनी भूषविली. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघात श २००९ साली थोडक्यात पराभव झाला. २०१४ पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.