बारामती : महान्यूज लाईव्ह
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या शिव सहकार सेनेच्या सचीवपदी बारामती तालुक्यातील वाणेवाडीचे संपत गंगाराम बनकर यांची निवड झाली आहे . माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व शिवसेना नेते खासदार आनंदराव अडसूळ हे या शिवसहकार सेनेचे अध्यक्ष असून त्यांनी नुकतेच बनकर यांना निवडीचे पत्र दिले आहे
सहकार चळवळ बळकट करण्याबरोबरच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे व धर्मवीर आनंद दिघे यांचे शिकवणुकीचा प्रचार करण्याचे मुख्य कार्य या शिव सहकार सेनेचे असल्याची माहीती या पत्रात दिली असून बारामती तालुक्यातील सहकार चळवळ बळकट करण्याची जबाबदारी बनकर यांचेवर सोपवली आहे .
संपत बनकर यानी सहकारी संस्थेमधे सचीवपदी काम केले असून आपला अभ्यास पाहून त्यांनी निवड केली असल्याचे सांगून यापुढे सहकार चळवळ बळकट करण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करु असे बनकर यानी निवडीनंतर सांगितले.