भोर : महान्यूज लाईव्ह
घटना भोर तालुक्यातील असून सन 2019 ते सन 2023 या कालावधीत साडेतीन लाख रुपये घेतले होते, मात्र त्यासाठी व्याज म्हणून 18 लाख रुपये रोख व दोन सदनिकांवर 23 लाख रुपयांचे कर्ज काढूनही आपल्या मालकीच्या मटन शॉप मध्ये जाण्यास मनाई केली व जातीवाचक शिवीगाळ केली. अशी तक्रार शिवापूर वाडा येथील मंगेश उत्तम घोलप यांनी केली असून दोघाजणांविरोधात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी ॲट्रॉसिटी व सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सुशिल ज्ञानेश्वर रोकडे व गणेश ज्ञानेश्वर रोकडे (दोन्ही रा शिवापुर ता हवेली जि पुणे) या दोघांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 6 सप्टेंबर 2019 ते 25 मे 2023 यादरम्यान शिवापुर गावच्या हद्दीत ही घटना घडल्याची फिर्याद घोलप यांनी दिली आहे.
या संदर्भात फिर्यादीनुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी सुशील रोकडे याने घोलप यास साडेतीन लाख रुपये दिले होते. त्याचे व्याज म्हणून शिवापुर वाड्यावरील तुकाई देवी नावाचे मटन शॉप हे पूर्ण पैसे दिल्याशिवाय उघडायचे नाही अशी ताकीद दिली व पोटाला पिस्तूल लावून जातीवाचक शिवीगाळ केली.
गणेश व सुशील या दोघांनी मिळून आतापर्यंत व्याज म्हणून 18 लाख रुपये रोख घेतले असून शिवापूर येथील आपले दोन फ्लॅट बँकेत तारण ठेवले व त्यातून 23 लाख रुपयांचे कर्ज घेतले एकूण साडेतीन लाख रुपयांसाठी 41 लाख रुपये या दोघांनी घेतले आहेत अशी फिर्याद घोलप यांनी पोलिसांकडे दिली होती. याचा पुढील तपास भोरचे उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे हे करीत आहेत