दौंड तालुक्यातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपी जेरबंद! स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई!

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ व दौंड शहरातील घरफोडीतील फरार असलेल्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले. ही माहिती पुणे स्थानिक गुन्हे आणि विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल वृंदावन समोर गीता पवन कुमार (वय ३० राहणार श्री सागर सोसायटी निगडी पुणे ) हे पार्किंगमध्ये गाडी पार्क करून चहा पिण्यासाठी गेले असता अज्ञात चोरांनी गाडीचा दरवाजा उघडून गाडीच्या पाठीमागील सीटवर ठेवलेली बॅग चोरून नेल्याची घटना ११ मे रोजी घडली होती.

याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच १७ एप्रिल २०२३ रोजी कुरकुंभ पांढरेवाडी येथील ऋतुराज कैलास जाधव यांच्या घरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी प्रवेश करून घरातील मोबाईल व इतर साहित्यांची चोरी करून चोरटे पसार झाल्याची घटना घडली होती.

या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. या पथकाने या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले. ऋतुराज जाधव यांच्या घरफोडीत चोरी झालेला मोबाईल व तो चोरणारा चोर हा कुरकुंभ व दौंड शहर परिसरात असल्याचा संशय स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला असल्याने या पथकाने दौंड शहरात सापळा रचला.

याप्रकरणी प्रवीण ऊर्फ पप्पू शामराव भोसले वय २९,रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा,जि. नगर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हॉटेल वृंदावन समोर गीता पवन कुमार यांच्या गाडीची दरवाजा तोडून चोरी करणारे आरोपी हे कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे या परिसरात सापळा रचला.

याप्रकरणी पोलिसांनी रोहित विलास तोरडमल ( वय २० सध्या रा. भोसले वस्ती कुरकुंभ बारामती रोड तालुका दौंड जिल्हा पुणे, मुळ रा. कडकनाथ वाडी तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद), प्रतीक कृष्णा सोनवणे (वय २१,रा. दौंड), रितेश सोनार (रा.कुरकुंभ ) या तिघांना अटक केली आहे. या आरोपींना पुढील तपासासाठी दौंड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार गणेश जगदाळे, हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, राजू मोमीन,
सहाय्यक फौजदार मुकुंद कदम आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

Maha News Live

Recent Posts

दौंड तालुक्यात तीन वाजेपर्यंत अवघं ३७ टक्के मतदान! अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात…

8 hours ago

आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा कथित व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून ट्वीट! पहा व्हिडिओ!

बारामती : महान्यूज लाईव्ह इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकाला शिवीगाळ…

13 hours ago