राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी निवासी नायब तहसीलदार अजित दिवटे तर आंबेगाव तालुका तहसीलदार पदी जुन्नर चे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे अतिरिक्त पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. हा आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिला आहे.
दौंड चे तहसीलदार संजय पाटील व आंबेगावचे तहसीलदार रमा जोशी यांची १३ एप्रिल रोजी बदली करण्यात आली होती. मात्र त्यांनी पदाचा पदभार सोडला नसल्याने त्यांच्या जागी नवीन तहसीलदार यांची नियुक्ती केली गेली नसल्याने तेच कामकाज पाहत होते.
मात्र जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दौंड तहसीलदार संजय पाटील यांचा पदभार काढून दौंडचे परिविक्षाधीन तथा स्वतंत्र निवासी नायब तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. तसेच जुन्नर चे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे आंबेगाव च्या तालुका तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.
त्यांच्या जागी नवीन अधिकारी यांची नेमणूक होईपर्यंत व पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी नुकताच जारी केला आहे.