बारामती : महान्यूज लाईव्ह
आम आदमी पार्टीची पंढरपूर ते रायगड ही स्वराज्य यात्रा सोमवार दि. २९ रोजी बारामतीत असणार आहेत. ही यात्रा बारामती शहरातून जाणार असून नगरपरिषदेसमोर जाहीर सभा होणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी बारामतीत आलेल्या पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी ही माहिती दिली.
आम आदमी पार्टी जनसामान्यापर्यंत पोचवणे, लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडणे, सत्तेतील वतनदारांना हटवून सर्वसामान्यांसाठी काम करणारे सर्वसामान्यांचे राज्य आणणे ही या यात्रेची उद्दिष्टे आहेत. राज्याच्या सर्व भागातून आलेले आपचे किमान दोनशे पुर्णवेळ कार्यकर्ते या यात्रेत सहभागी असणार आहेत. पंढरपूर येथे दि. २८ मे रोजी सुरु होणारी ही यात्रा पंढरपूर, बारामती, सांगली, कोल्हापूर, सातारा, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, नवी मुंबई, पनवेल या मार्गाने जाऊन राज्याभिषेकदिनी दि. ६ जून रोजी रायगड किल्ल्यावर पोचणार आहे.
यावेळी या यात्रेच्या नियोजनासाठी आलेल्या पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बारामतीतील नागरिकांनी उर्त्स्फूत स्वागत केले