राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांची नुकतीच बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी गडचिरोली येथे काम करणारे स्वप्निल चंद्रशेखर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस उपाध्यक्ष व सहाय्यक पोलीस आयुक्त या पदाच्या तब्बल ११९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड व भोर तालुका उप पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांची सातारा जिल्ह्यातील फलटण उपविभागीय कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल चंद्रशेखर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच भोर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय हरिदास पाटील यांची नागपूर शहर सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या जागी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी दिलीप बरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव स्वप्निल बोरसे यांनी या बदल्यांचा आदेश नुकताच जारी केला आहे.