नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
केंद्र सरकारने सात वर्षानंतर का होईना आपली चूक सुधारली आणि दोन हजार रुपयांची नोटा चलनातून बंद केल्या आहेत. आता तुमच्याकडे शिल्लक असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा येतात 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने दिली आहे.
यापुढील काळात दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार असून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या आहे त्या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत नागरिकांना बँकेत जमा करता येणार आहेत त्याचबरोबर आता बँकांनी ग्राहकांना दोन हजार रुपयांच्या नोटा देणे थांबवावे अशी सूचना देखील रिझर्व बँकेने दिल्या आहेत.
एकावेळी फक्त दहा नोटा बदलता येणार!
नोटा बदलण्याची मुदत दिली असली, तरी एका जणाला एका वेळेस फक्त दहा नोटाच बदलता येणार आहेत. ही देखील खोच यामागे असून, फक्त वीस हजार रुपयांची अदलाबदल करता येणार आहे. 23 मे 2023 पासून बँकांमध्ये जाऊन दोन हजार रुपयांच्या नोटा लोक बदलून घेऊ शकतील, परंतु एका वेळेस फक्त दहा नोटा बदलता येणार आहेत.
रोहित पवारांनी सरकारला लगावला टोला
दरम्यान यापूर्वीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देखील दोन हजार रुपयांच्या नोटा थांबवाव्यात, जर काळा पैसा शोधायचा असेल तर दोन हजार रुपयांसारख्या नोटा छापू नयेत अशी सूचना केली होती. मात्र आता सात वर्षानंतर का होईना सरकारने आपली चूक सुधारली आहे अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.