अचानक चुना डोळ्यात उडाला आणि डोळ्यापुढे अंधार पसरला.. शिरूरचे ते डॉक्टर देवदूतासारखेच भेटले अन् श्रवणला पुन्हा दृष्टी मिळाली‌.!

शिरूर : महान्यूज लाईव्ह

चुन्याची पुडी तो खेळत होता…अचानक चुना डोळ्यात उडाला अन् त्याच्या समोर अंधार झाला…मात्र शिरूर चे डॉक्टर त्या कुटुंबाला देवदुतासारखे भेटले अन् गेलेली दृष्टी मिळवण्यास पुन्हा यश आले.

शिरूर शहरातील नेत्रतज्ज्ञ डॉ.स्वप्नील भालेकर यांच्या प्रयत्नाने नुकतेच एका चिमुकल्याला पुन्हा जग दिसू लागले आहे. श्रवण संदीप फडतरे (रा. पुसेगाव,खटाव, जि. सातारा) हा दि.२१ फेब्रुवारी रोजी शेतात आजी सोबत गेला होता. यावेळी शेतात पाटाच्या पाण्यात वाहत आलेली चुन्याची पुडी त्याच्या हाती लागली.

यावेळी चुन्याच्या छोट्या पुडीबरोबर खेळत असताना अचानक त्यातील चुना श्रवण च्या डोळ्यात उडला.काही क्षणात संपूर्ण डोळ्याची आग होऊ लागली. कुटुंबीयांनी तातडीने त्यास दवाखान्यात नेले.यावेळी डॉक्टरांनी तातडीनं शिरूर येथे उपचारास नेण्याचा सल्ला दिला.

शिरूर येथील दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉ.सोनल भालेकर व स्वप्नील यांनी डोळ्यांची तपासणी केली. डोळ्यात पृष्ठभागावर त्वचा जळून बुबुळलाही जखम झाली होती. तातडीने उपचार करणे गरजेचे होते.हे लक्षात घेत डॉक्टरांनी डोळ्यात स्टेमसेल वापरून त्वचा पूर्ववत केली.

त्यानंतर पुन्हा काही उपचार करत डोळे पूर्ववत केले. त्यानंतर दोन जोखमीच्या शस्त्रक्रिया ही केल्या. अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येत श्रवण ची दृष्टी पुन्हा मिळाली. डॉ.स्वप्नील यांनी सांगितले की, लहान मुलांना सांभाळताना विशेष काळजी घ्यावी.प्रत्येकाने आपल्या डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

Maha News Live

Recent Posts

ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह वाई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या…

8 hours ago

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीत..!

बारामती : महान्यूज लाईव्ह उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी विकास कामांची…

23 hours ago