विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा समिती अंतर्गत पोलीस प्रशिक्षण केंद्रातून पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या ३४ विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस दलात भरती होऊन राज्यसेवा परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. मागील महिन्यात ६० विद्यार्थी पोलीस भरती झाले होते. त्यांचा राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सत्कार केला होता अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी दिली.
मागील ५ वर्षात विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातून एकूण १६६ विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत यशस्वी झाले आहेत. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील असंख्य विद्यार्थी तहसीलदार, लेखाधिकारी, विक्रीकर निरिक्षक, लेखापरीक्षक, पोलीस काॅनस्टेबल, पोलीस उपनिरीक्षक इ. पदावर विराजमान झालेले आहेत. त्यामुळे महाविद्यालयाची ओळख ग्रामीण भागातील राज्यसेवा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उत्तम अभ्यासाचे केंद्र म्हणून झाली आहे.
ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. स्पर्धा परीक्षा समितीचे समन्वयक डॉ. सुनिल ओगले, विशाल भोसले व विशाल चव्हाण व स्पर्धा परीक्षा समितीतील सर्व सदस्यांनी यासाठी गेली दोन वर्षे मेहनत घेतली होती. त्यांचे प्राचार्य डॉ शिंदे यांनी मनापासून कौतुक केले.
विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान मध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा आग्रह केल्यामुळे असंख्य होतकरू विद्यार्थ्यांनी राज्यसेवा परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविता आले.
संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सौ. सुनेत्रा पवार, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, श्री किरण गुजर, श्री मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे व डॉ.लालासाहेब काशीद, निलीमा पेंढारकर, विशाल भोसले व विशाल चव्हाण आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.