बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरात आज पहाटे पाच वाजता माळेगाव रस्त्यालगत असलेल्या शिवसागर हार्डवेअर आणि प्लायच्या दुकानात वीजेचे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत प्लायवुड जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही आग अचानक वाढली. पहाटे व्यायामाला जाणाऱ्या लोकांनी हवेचे लोळ पाहिले, तोपर्यंत आग पूर्ण भडकली होती.
बारामती नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ही आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत लाकडी दरवाजे, विविध कंपन्यांचे कलर, तसेच साहित्य जळाले. याशिवाय शेजारच्या आदित्य प्लाय आणि काचेच्या दुकानातही ही आग पोचल्याने या दुकानातील देखील साहित्य जळून खाक झाले.