बारामती – महान्यूज लाईव्ह
विविध कारणांनी संबंधित ग्राहकांचे बीज कनेक्शन तर महावितरण बंद केले पण हे ग्राहक काही थांबले नाहीत त्यांनी चोरून वीज वापरली अशांची फेर तपासणी महावितरण ने केली आणि त्यात बारामती परिमंडळामध्ये तब्बल 329 सापडले की ज्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आणि त्यांना तब्बल 40 लाखांचा दंड ठोठावला.
वारंवार पाठपुरावा करुनही एखाद्या ग्राहकाने वीजबिल भरले नाही तर महावितरणकडून कनेक्शन तात्पुरते बंद केले जाते. पुढील तीन महिन्यातही जर थकबाकीचा भरणा केला नाही तर मात्र कनेक्शन कायमस्वरुपी बंद केले जाते. जोपर्यंत त्या बंद कनेक्शनची थकबाकी व्याज व दंडासहित भरली जात नाही तोवर त्या जागेवर नवीन कनेक्शन दिले जात नाही.
बारामती परिमंडलात अशा प्रकारच्या 5 हजारांहून अधिक प्रकरणांची पडताळणी झाली. ज्या ठिकाणी थकबाकीचा भरणा झाला त्यांना वगळून तब्बल ३२९ प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यात त्या ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी तब्बल ३७ लाख ९५ हजारांचा दंड वसूल होणे अपेक्षित आहे.
बारामती परिमंडलात मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी धडक कारवाई केली. त्यातून सातारा जिल्ह्यात १ तर सोलापूर जिल्ह्यात तब्बल २७३ तसेच बारामती मंडलात ५५ असे एकूण ३२९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणच्या या धडक कारवाईने परिसरातील वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.