दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वेळे येथील खंबाटकी बोगदा आज दिवसभराच्या अपघातांनी चांगलाच चर्चेत राहिला या बोगद्याच्या बाहेर अगदी तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. अनेक वाहने एकमेकांना पाठीमागून धडकल्याने वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या घटनेची सुरुवात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. जेव्हा वेळे येथील खंबाटकी बोगद्यात विरुद्ध दिशेने एक एसटी अचानक घुसली. नशीब असे की बस विरुद्ध दिशेने येताच भरघाव वेगात येणाऱ्या कारने ब्रेक लावला. आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक वाहने धडकत गेली.
यात वाहनांचे नुकसान झालेच पण पुन्हा लागलीच दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुन्हा बोगद्यातच तीन कारचा भीषण अपघात झाला. अखेर महामार्गाच्या पोलिसांना अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाहेर काढावी लागली. अशी वाहने धडकून वाहनांची रांग लागल्याचे समजताच जोशीविहीर येथील महामार्ग पोलीस ठाण्याचे फौजदार पी .डी .धनवडे, ऐ. पी.डेरे, एच. व्ही. कचरे, पी. एम. फरांदे, आर. ए. मुलाणी,बी.जी. कदम, एम. डी. गायकवाड आदींनी अपघात स्थळावर पोहोचून बोगद्यात आणखी नुकसान व अपघात होऊ नये म्हणून चार ते पाच कारचालकांना व प्रवाशांना बोगद्यातुन बाहेर काढले.
नंतर अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाहेर काढून वाहतूक सुरळीत सुरु केली, मात्र त्यानंतर बोगद्यात पुन्हा अपघात झाल्याची माहिती मिळताच पुन्हा पोलिस यंत्रणा वेळे येथील अपघातस्थळाकडे रवाना झाली. तब्बल तीन तासानंतर येथील झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यात पोलिसांना यश आले. करत असलेल्या प्रवाशांना जलद न्याय दिल्या बद्दल वाहन चालकांन सह
प्रवाशांनी या वेळी आभार मानले आहेत .