हेमंत थोरात : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील कळस नजीकच्या पिलेवाडी येथे शनिवारी रात्री झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.
कळस, पिलेवाडी येथे झालेल्या अपघातात गौरी कुमार राम, दिवाना राम (दोन्ही रा व ता. लावला जिल्हा पाटणा, बिहार) हे दोघे जागीच मरण पावले तर संतोष राम हा तिसरा गंभीर जखमी झाला आहे.
यासंदर्भात राहुल गोविंद वायाळ (रा. कळस ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली. त्यावरून वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वायाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष विठ्ठल लांडगे (रा.वावरहिरे ता. माण जि. सातारा) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात काल शनिवारी संध्याकाळी सात वाजता पिलेवाडी नजीक घडला. कळस रुई रस्त्यावर हा अपघात घडला. टीव्हीएस कंपनीची दुचाकी (एम एच 42 88 77) व ट्रेलर ( एम एच झिरो चार एस 69 72) यामध्ये ही धडक झाली. संतोष विठ्ठल लांडगे हा ट्रेलर घेऊन रुई कळस रस्त्यावरून जात असताना समोरून निघालेल्या टीव्हीएस दुचाकीला टेलरने पाठीमागून धडक दिली.
या धडकेत गौरी आणि दिवाण यांना गंभीर मार लागून त्यांच्या जागीच मृत्यू झाला, तर तिसरा संतोष राम हा जखमी आहे. सहाय्यक निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार टिळकेकर पुढील तपास करत आहेत.