शिरूर : महान्यूज लाइव्ह
बाभूळसर बुद्रुक (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी दिपाली महेंद्र नागवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गणेश तान्हाजी मचाले यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. या रिक्त झालेल्या पदासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. या वेळी एकमेव अर्ज आल्याने दिपाली नागवडे यांना बिनविरोध घोषित करण्यात आले.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी पी. बी. शेटे यांनी काम पाहिले.
निवडीनंतर सरपंच दिपाली नागवडे यांनी सांगितले की,”सर्वांनी मोठा विश्वास ठेवत सरपंच पदावर काम करण्यासाठी संधी दिली.यापूर्वी कोरोना काळात तसेच उपसरपंच पदावर असताना अनेकांची कामे करता आली.पुढील काळात पदाचा तळागाळातील लोकांची सेवा करण्यासाठी उपयोग करणार आहे. सर्व सदस्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
या वेळी बबन ढमढेरे,हनुमंत पाटोळे, अंकुश नागवडे, सूनील नागवडे, भाऊ थोरात, दिलीप नागवडे, फत्तेसिंग नागवडे, संतोष टेकवडे, नानासो नागवडे, सुरेश टेकवडे, अंकुश टेकवडे, पोपट जगताप, नवनाथ नागवडे, जयदीप नागवडे, सगाजी नागवडे, सोमनाथ नागवडे, दत्ता नागवडे, सुरेश नागवडे, बाळासो राऊत, किरण राऊत, मनोज मचाले, शरद नागवडे, रमेश टेकवडे ,नंदा कांबळे, प्रियंका काळे, दिपिका नागवडे, आत्याबाई कुदळे, कलावती टेकवडे, सुवर्णा गरुड, स्वाती टेकवडे, वर्षा नागवडे, सविता टेकवडे, सुनीता टेकवडे, सविता नागवडे, रेखा जगताप, मंगल नागवडे, मंगल टेकवडे, राणी टेकवडे आदी उपस्थित होते